इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 शाळेचा निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञ असावे-भागवत मसने

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-इयता दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून निरोप घेतांना आपल्या शिक्षक व शाळांप्रति कृतघ्न असावे असा सल्ला सुप्रसिद्ध वात्रटिकार तथा शिक्षक भागवत मसने यांनी दिला. ते होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, होळ ता केज जिल्हा बिड येथे इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक परमपूज्य नारायण दादा काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  या निरोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून  भागवत मसने यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सुधीर शिंदे महसूल सहाय्यक, मीरा राख कर सहाय्यक, कांचन हरगावकर जेल पोलीस हे देखील उपस्थित होते.

              या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध वात्रटिका कार भागवत मसने म्हणाले की शालेय जीवना पासूनच शिक्षक,  शाळा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देतात. शाळेतील  प्रत्येक विषयाचे शिक्षक वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आणि पायाभूत स्तरापासूनच आपल्याला घडवण्याचे काम ते करतात  . त्यामुळेच विद्यार्थी हे शाळेतुन बाहेर पडल्यानंतर या सर्व बाबींचा बळावरच पुढे आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतात. विद्यार्थ्यांनी  देखील आपण आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असताना शिक्षक व आपल्या शाळेप्रती कृतज्ञेची भावना सदोदित बाळगावी असा मार्मिक सल्ला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिला.

              घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ; माहेरी जा सुवासाची कर बरसात: आज याच भावनेने या शाळेचे माजी विद्यार्थी जे एम पी एस सी च्या पदावर नियुक्त झालेले  सुधीर शिंदे, महसूल सहाय्यक, मीरा राख, कर सहाय्यक/ महसूल सहाय्यक तर कांचन हरगावकर जेल पोलीस/मुंबई शहर पोलीस, शाळेच्या वतीने आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आले असतील अशी आशा मसने यांनी व्यक्त केली. अशाच  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या वाटेवर आपण चालावे व आपले , पालकाचे व शाळेचे नाव उज्वल करावे असेही मत सुप्रसिद्ध वात्र टीकाकार कवी भागवत मसने यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करत असताना भान ठेवावे. वारंवार सेल्फी काढल्याने आपल्या रूपात काहींही बदल होत नाही. सेल्फीनेच अनेक जीवांचा घात केला आहे. त्यामुळे या मोबाईलचा आपल्या जीवनात सकारात्मक व विधायक कामासाठीच विद्यार्थ्यांनी उपयोग करान्याचा सल्ला कवी भागवत मसने यांनी दिला. विद्यार्थी दशेतच आपले लक्ष्य ठरवून आपली प्रगती आपण साध्य करावी. तसेच मी आयुष्यात कधीच कॉपी करणार नाही हा संकल्प देखील आपल्या मनाशी दृढ करावा.निश्चितच यश आपल्या पदरात पडतअसे मसने यांनी सांगितले.

            या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक मलदोडे ,पालक सूर्यभान राख , ग्रंथपाल देशमुख मॅडम, केंद्रे मॅडम या उपस्थित होत्या. या निरोप समारंभाचे बहारदार असे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!