लावण्याई पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 

...............................

परळी वैजनाथ 19 ( प्रतिनिधी)

 परळी वैद्यनाथ येथील लावण्याई पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी परळी शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते बाजीराव भैया धर्माधिकारी, परळीचे भूमिपुत्र तथा मुंबईच्या  उच्च  न्यायालय विधीज्ञ म्हणून गौरवपूर्ण कामगिरी करणारे ॲड. तेजेश  दंडे, जैन हॉस्पिटलचे संचालक डॉ कुणाल जैन, वैजनाथ देवस्थानचे सदस्य प्रदीप देशमुख, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, माजी नगरसेवक रमेश चोंडे, प्रा. रविंद्र जोशी, शामराव कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष  तथा पत्रकार अनंत कुलकर्णी,  आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता विर्धै यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे ॲड तेजेश  दंडे यांनी शाळेच्या प्रगतीचा गौरव करताना सांगितले की, "लावण्याई पब्लिक स्कूलने किरायाच्या जागेतून प्रवास सुरू केला असला तरी भविष्यात स्वतःची भव्य इमारत उभारून शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श व शैक्षणिक क्षेत्र नवा मापदंड निर्माण करेल, असा मला विश्वास आहे." तसेच, येत्या शैक्षणिक वर्षात डॉ. स्व. दिगंबर दंडे यांच्या नावाने अद्ययावत संगणक प्रयोगशाळा (कॉम्प्युटर लॅब) उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी दंडे परिवाराकडून शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच पालक आणि शिक्षकांनी पुढची पीढी घडवताना मुलांना ईतरानबाबत दया आणि सहानुभूती (compassion and Empathy) शिकवण्याचा आग्रह केला.


कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी अनंत कुलकर्णी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील धडपडीचा व अथक परिश्रमाचा, कार्याचा उल्लेख करत सांगितले की, "पत्रकारितेपासून संस्थाचालक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. परळी शहरात मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अनेक नवीन शाळा निर्माण होत आहे त्यामुळे वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी उपक्रमशीलता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी सर्जनशील उपक्रम राबवले पाहिजेत. आगामी काळामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर परळी शहरात वाढणार आहे. " 

दरम्यान  पञकार लक्ष्मण  वाकडे यांनी आपल्या  मनोगत  व्यक्त  करतांना म्हणाले  की लावण्याई  पब्लिक  स्कूल  ही आदर्श  शाळा म्हणुन  परळीत  नाव केल्याशिवाय  राहणार  नाही या लावण्याई पब्लिक स्कुल ला मध्ये  विविध सांस्कृतिक कार्यक्रम  घेतले जातात  मुलांचा अभ्यास वर लक्ष दिले जाते  


कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत पर भाषण प्राचार्य कविता विर्धे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कांबळे सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता विर्धे, लाड मॅडम, देशमुख मॅडम, गोजे मॅडम आणि इतर शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, सामाजिक प्रबोधनपर नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थी स्नेहसंमेलन रंगतदार झाले. उपस्थित पालक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

लावण्याई पब्लिक स्कूलच्या या यशस्वी स्नेहसंमेलनामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीला नवी दिशा मिळाली, असे समाधान पालकांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सरांनी केले. या कार्यक्रमात  लावण्याई पब्लिक स्कुल च्या वतिने बेस्ट  पालक आणी बेस्ट स्टुडंट देण्यात  येत असतो या वर्षी  चे मानकरी  पालक   शेख नसरीन व बेस्ट  स्टुडंट  समर्थ  सुनिल  कौलवार  यांचा  तेजेश  दंडे  यांच्या  हस्ते  पुरस्कार  देण्यात  आला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !