पोटगीची रक्कम तुटपुंजी : मुलावर मोठा दबाव-  करुणा शर्मा- मुंडे काय म्हणाल्या?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोटगी प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला.  धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. 

  पोटगीची रक्कम तुटपुंजी असल्याचे म्हणत आपण यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

   करुणा मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांचा मुलगा सिशिव मुंडे यांने एक पोस्ट करुन खळबळ उडवून दिली. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले. सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला. तसेच आई करुणा मुंडेंवर गंभीर आरोप देखील केले.

त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना मुलाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. "तो किती तणावात होता, त्यांच्या डोक्यावर किती प्रेशर होता हे माध्यमांनी पाहिलं आहे. माझ्यावरही मीडियासमोर बोलू नका यासाठी दबाव टाकला जात होता. मी काही वाईट बोलत नव्हती. मी न्यायालयाचे आणि माझ्या वकिलांचे फक्त आभार मानत होते. मुलांना सतत आपल्या वडिलांचे फोन येत होते. त्यातूनच दबाव निर्माण झाला आणि ही पोस्ट केली," असं स्पष्टीकरण करुणा मुंडे यांनी दिलं.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार