डिजिटल मीडिया परिषदेच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी अभिजीत लोमटे कार्याध्यक्ष सतीश मोरे तर सचिवपदी मोहम्मद फैजान
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद तालुका अंबाजोगाईची कार्यकारणी डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी जाहीर केली आहे.
डिजिटल मीडिया परिषद तालुका अंबाजोगाई च्या अध्यक्षपदी संग्राम महाराष्ट्राचा न्यूज चे संपादक अभिजीत लोमटे, कार्याध्यक्ष अंबाजोगाई दर्शन न्युज चे संपादक सतीश मोरे,उपाध्यक्ष न्यूज लोकमन संपादक संजय जोगदंड, उरुज न्यूज चैनल संपादक आरेफ सिद्दिकी, ए एम न्यूज संपादक अमोल माने (ग्रामीण ),सचिवपदी सरकार एक्सप्रेस न्यूज चॅनल प्रतिनिधी मोहम्मद फैजान, सहसचिव सचिन मोरे,ता संघटकपदी योगेश्वरी न्यूज चॅनलच्या संपादक नागेश औताडे,युवाशक्ती न्यूज प्रतिनिधी सय्यद नईम,कोषाध्यक्ष एन टीव्ही न्यूज प्रतिनिधी मनोज कोकणे,सहकोषाध्यक्ष जंग न्यूज प्रतिनिधी अहमद पठाण, कार्यक्रम प्रमुखपदी गोल्डन मीडिया न्यूज चॅनलचे गजानन वांगीकर चौधरी,प्रसिद्धी प्रमुख सूर्योदय न्यूज चॅनलचे बालाजी देशमुख,योगेश डाके यांची नूतन कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया परिषद तालुका अंबाजोगाई कार्यकारणी जाहीर होताच निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा