चिमुकल्या शिवरायांनी आणि चिमुकल्या जिजाऊंनी गजबजली स्कॉलर केजी स्कूल!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्कॉलर केजी स्कूलमध्ये बुधवारी उत्साहात संपन्न झाली.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आणि मुलींनी जिजाऊंचा वेष परिधान केला होता. शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या आदर्श विचारांचा वारसा घेत पुढे चालण्याचा संकल्प घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखी कृती करत महत्त्वाची वाक्य सुंदर आवाजात बोलून दाखवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके आणि प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
छत्रपती शिवराय आणि जिजाऊंच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शाळेतील एन्ट्री खास पद्धतीने घेण्यात आल्याने लक्षवेधी ठरली.
उपस्थित महिला पालकांसाठी मार्गदर्शन करत असताना श्री चंद्रशेखर फुटके यांनी या बाल शिवरायांना घडवण्याचे काम जिजाऊंच्या रूपात उपस्थित असलेल्या मातांनी करावे असे आवाहन केले.
त्यानिमित्ताने झालेल्या छोटेखानी स्पर्धेत प्रथम क्रमांक चि. लक्ष जैस्वाल, द्वितीय सौम्या नव्हाडे तर तृतीय क्रमांक आराध्या रोकडे हिने मिळवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका वर्षा लाड, प्रमिला कदम, संगीता रोकडे, राजश्री हलकांचे, ज्योती वळसे, भाग्यशाली शिंदे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा