इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

खोटे आरोप आणि वस्तुस्थिती नेमकं काय?

 IFFCO ने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून त्यांची उत्पादने विक्री करण्यास याआधीच घातलेली आहे बंदी

अंजली दमानिया यांनी नॅनो खतांच्या ऑनलाईन खरेदीवरून केलेले खोटे आरोप आणि वस्तुस्थिती


मुंबई (प्रतिनिधी) - जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था IFFCO ने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केलेले आहे की कोणत्याही ई - कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा अधिकार नाही. 


अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करण्यात येणारी IFFCO ची उत्पादने ही संपूर्णतः खरेदीदारांच्या जबाबदारीवर आहेत. सदर प्लॅटफॉर्म गैरवाजवी किंमतीत ही उत्पादने अनधिकृतरित्या विकतात. ऑनलाईन खतविक्री बाबतच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार '' एफ सी ओ " परवाना किंवा IFFCO कडून अनिवार्य असलेला 'ओ फॉर्म' नसलेल्या कोणत्याही संस्थेस उत्पादने विक्री करण्यास मनाई घातलेली असून असे केल्यास त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार IFFCO ने राखून ठेवलेला आहे. याबाबत IFFCO ने वेळोवेळी प्रेस नोट काढून माध्यमांना देखील माहिती दिलेली आहे. 


IFFCO कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री किंमत ही संपूर्ण देशात सारखीच आहे. मात्र काही कमर्शिअल ई - कॉमर्स प्लॅटफॉर्म या खतांच्या दहा - पाच बाटल्या कुठूनतरी उपलब्ध करून त्या ऑनलाईन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकचे डिस्काउंट देऊन विक्रीस ठेवतात. अशी माहिती समोर आल्यानंतर IFFCO ने संबंधितांना नोटिसा सुद्धा दिलेल्या आहेत. 


अंजली दमानिया यांनी आज सांगितलेल्या ऍग्री बीग्री या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे वादात येण्यापेक्षा संबंधित कंपनीने सदर उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली असावी. कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अशी विक्री बंद होत नसते, ही साधी गोष्ट अंजली दमानिया यांना समजायला हवी. मात्र त्या जाणीवपूर्वक या ऑनलाईन खरेदीच्या नावाने आवई उठवून धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत.


मुळात ऍग्र्री बिग्री या प्लॅटफॉर्म वरून दमानिया यांनी ऑनलाईन ऑर्डर केल्याच्या कितीतरी आधी IFFCO ने सदरील बंदी घातलेली आहे. त्यामुळे दमानिया यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण व योग्य माहिती पडताळून व्यक्त व्हायला हवे. 


मात्र बीड घटनेमध्ये एन्ट्री केल्यापासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या वर सातत्याने ऐकीव व अर्धवट माहितीच्या आधारे खोटेनाटे आरोप करून सनसनी निर्माण करण्याचा सपाटा लावलेला आहे. 


राख वाहतूक व ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी खात्यातील खरेदी प्रक्रिया ते अगदी अटक असलेल्या तीन आरोपींचे मृतदेह आढळले, असे अनेक धादांत खोटे आरोप याआधीही अंजली दमानिया यांनी केले असून, या संदर्भात आढळलेली, विषयांना संबंधित असलेली व नसलेली अर्धवट कागदपत्रं त्या ' पुरावे ' म्हणून पुढे करत जनतेची आणि माध्यमांची दिशाभूल करत आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!