आजारी तरीही कामावर.!!!

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील इष्टांक वाढीसंदर्भात धनंजय मुंडे यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचा मंत्री मुंडेंनी घेतला सविस्तर आढावा


बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीबाबत ही घेतली सर्वंकष माहिती


मुंबई (प्रतिनिधी) - राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबई येथे होणार असून या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात विभागाचा जिल्हा निहाय आढावा घेतला. 


अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील विविध जिल्ह्यात इष्टांक वाढवणे, ई पॉस मशीन सह सर्व अन्य समस्या याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेत धनंजय मुंडे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या. 


विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे तसेच ज्या जिल्ह्याने इष्टांक पूर्ती केली आहे त्यांना वाढीव मागणी असल्यास इष्टांक देण्यासंदर्भात तसेच ईष्टाकाची पूर्ती न केलेल्या जिल्ह्यातील उर्वरित इष्टांक हा अन्य आवश्यकता असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


बुलढाणा जिल्ह्यात रेशनचे धान्य व त्यामुळे केस गळती होत असल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या असून त्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व योग्य त्या सूचना केल्या. 


या बैठकीस विभागाच्या सहसचिव, उपसचिव यांसह सर्व जिल्ह्यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी आदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.


आजारी तरीही कामावर


धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असून त्यांना बेल्स पाल्सी या आजाराचे निदानही झाले होते.


 त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामास त्यांनी सुरुवात केली आहे.


डोळ्यांची हालचाल आणि अधिक काळजी म्हणून त्यांनी डॉक्टर चे सूचनेनुसार गॉगलचा वापर करत मीटिंग घेतली. अद्यापही स्पष्टपणे,  सलग बोलण्यास त्रास होत असतानाही त्यांनी आपल्या कामकाजास आता सुरुवात केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार