गेवराई शहरातील बस स्थानक आदर्श, सुंदर व स्वच्छ करावे- अनिल बोर्डे
गेवराई( प्रतिनिधी)...
बस स्थानकात प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडीअडचणींना सामना करावा लागत आहे खालील मागण्याबाबत विचारविनिमय करून मागण्याची पूर्तता करण्यात यावी यासंदर्भात गेवराई येथील आगार प्रमुखांना विविध मागण्याचे निवेदन बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी लेखी स्वरुपात दिले आहे. या निवेदनावर पंधरा दिवसात कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार करणे यूपीआय पेमेंटच्या संदर्भात प्रवाशांमध्ये व वाहक चालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे . बस स्थानकामध्ये व बसमध्ये यूपीआय संदर्भात पोस्टर व फलक लावून जन जागृती आवश्यक आहे. नादुरुस्त बसेस व नादुरुस्त तिकीट काढण्याची मशीन मार्गस्थ बस मध्ये देऊ नयेत. सर्व सोयी युक्त बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन ई बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. बस स्थानकामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कायम स्वरूपी थंड पाण्याची सर्व सोयी युक्त पान पोई तात्काळ सुरू करण्यात यावी. बस स्थानक परिसरामध्ये विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात यावी . बस स्थानकामध्ये पोलीस चौकी सुरू करावी व पोलीस मित्राचे नाव व त्याचा भ्रमणध्वनी हेल्पलाइन ठळक दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. गेवराई आगारातून त्र्यंबकेश्वर व माहूर या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी गेवराई आगारातून एकही बस उपलब्ध नाही यापूर्वी वारंवार मागणी करून बस सुरू झाली नाही. नवीन बस येताच सुरू करण्यात यावी. तसेच बस भाडेवाढ मागे घेण्यात यावी भाडेवाढ प्रवाशाला परवडत नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना जागा मिळणे आवश्यक असताना जागा मिळत नाही याबाबत योग्य निर्देश देण्यात यावेत .
सर्व प्रवाशांना बस मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी बस स्थानकामध्ये बस स्थानकात उपलब्ध असणारे नाथ जल पंधरा रुपयात उपलब्ध होणे आवश्यक आहे. बस स्थानक तील खाद्यपदार्थ बाबत दरपत्रक अद्याप पर्यंत लावण्यात आले नाही जास्तीच्या दराने पाणी व पदार्थ विक्री होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बस स्थानकातील शौचालय जुन्या स्थितीत असल्यामुळे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. बस स्थानक परिसरात झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे . बस स्थानकातील बस बाबतची माहिती प्रवाशांना भ्रमणध्वनी द्वारे मिळणे आवश्यक आहे. बस स्थानकातील सर्व विद्युत पंखे बंद स्थितीत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पंख्याची अत्यंत आवश्यकता आहे तरी पंखे विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात यावी बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर आधुनिक करावा व परिसरामध्ये स्वच्छता राहील याबाबत दक्षता घ्यावी प्रवाशामध्ये स्वच्छता ठेवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बस स्थानकावर व बसमध्ये फलक व बॅनर मोठ्या प्रमाणात लावणे आवश्यक आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकावर हिंदू हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानामध्ये आपल्या गेवराई बस स्थानकाचा महाराष्ट्रात एक नंबर राहील याबाबत आपण स्वतः व आपल्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी वर्गानी प्रयत्न करून अभियान यशस्वी करून दाखवावे. तरी वरील मागण्याबाबत सकारात्मक विचार करून पंधरा दिवसात लेखी स्वरूपात कळवावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे आगारप्रमुखाकडे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा