वडखेल येथे १ मार्चची 'शाम' होणार 'सुंदर' : 'सोन्नर' कुटुंबांचा होणार गौरव

वडखेलच्या एकाच कुटुंबातील तिनही भावंडं बनले अधिकारी !

ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन 

परळी-वैद्यनाथ (प्रतिनिधी) : वडखेल येथील शेतकरी कांताबाई शामसुंदर सोन्नर यांची तीन मुलं वेगवेगळ्या अस्थापनामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी झाले आहेत. हे तिन्ही अधिकारी आणि त्यांना घडविणारी आई कांताबाई शामसुंदर सोन्नर यांचा सत्कार वडखेल ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात निवृत्त नायब तहसीलदार बी. एल.रुपनर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

वडखेल येथील मुख्य चौकात 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान सरपंच भारतबाई व्यंकटराव देवकते या भूषविणार आहेत.  तर यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश चव्हाण, माजी शासकीय अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, भाजप युवा मोर्चा बीड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते, युवा नेते, शासकीय अधिकारी रत्नाकर देवकते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भटकेविमुक्त परळी तालुका अध्यक्ष गणेश देवकते, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष माऊली महाराज आगलावे, युवा नेते गोविंदराव देवकते, माजी सरपंच अंगद गंगणे, सूर्यकांत देवकते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एसटी कामगार नेते अशोक देवकते हे मार्गदर्शन करणार आहेत.

वडखेल येथील रहिवाशी कांताबाई शामसुंदर सोन्नर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून लहानपणापासूनच मुलांमध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजविले. त्यासाठी चांगल्या शाळात प्रवेश मिळविणे, योग्य वेळी शिकवणी लावणे, शाळेतून दिलेला अभ्यास मुलं करतात की नाही यावर लक्ष ठेवणे, हे काम कांताबाई करत असत. मुलं जशी मोठी होऊ लागली तशी त्यांच्या मनात उच्च स्वप्न रुजवली. त्यातून मुलगी माधुरी हिची स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात कर निरीक्षक पदावर निवड झाली, दुसरी मुलगी ज्ञानेश्वरी हिने कायद्याची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. या तिच्या प्रयत्नाला यश आले असून मुंबई महानगर पालिकेच्या विधी विभागात सहायक कायदा अधिकारी पदावर तिची निवड झाली आहे. तर मुलगा साईप्रसाद याने स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल इंजिनियर) घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. साईप्रसाद याची निवड महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर झाली. जिद्दीने यश संपादन करणारे हे तिन्ही भावंड आणि त्यांना घडविणारी आई कांताबाई यांचा सत्कार वडखेल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.

बी. एल. रुपनर यांचा निवृत्ती निमित्त सत्कार 

परळीचे लोकप्रिय नायब तहसीलदार बी. एल. रुपनर हे अलिकडेच आपल्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, वडखेल ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार