काय काळजी घ्यावी ?

महाशिवरात्र पर्व:  उपवास करणारांची मोठ्या प्रमाणावर संख्या:मात्र उपवासासाठी घ्या 'ही' काळजी !


उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना महाराष्ट्रात निदर्शनास येत आहेत.


       भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस (Aspergillus) प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन (Fumigaclavine) यासारखी विषद्रव्ये (Toxins) तयार होतात. ऑक्टोंबर महिन्यातील तापमान आणि आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते. अशी प्रादुर्भाव भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भगर खाताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.


भगर खाताना काय काळजी घ्यावी.


1) बाजारातुन भगर आणल्यानंतर ती निवडुन स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीट बंद भगर घ्या. बँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली पाकीटे व सुटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग व अंतिम दिनांक तपासा.


2) भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी व्यवस्थीत झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. तसेच जास्त दिवस भगर साठवू नका व जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.


3) शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका, भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषुन घेण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे पिठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी.


4) भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या, जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच दळा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार