इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

थेट अन् ग्रेट : भरतभेट !

आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भूमीपुत्राचा उद्या सन्मान व संवाद सोहळा !

थेट अन् ग्रेट : भरतभेट ! कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ प्रतिनिधी

     तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा उद्या १६ फेब्रुवारी रोजी सन्मान व संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केवळ सन्मानच नाही तर थेट अन् ग्रेट : भरतभेट  असे आगळेवेगळे या समारंभाचे स्वरूप आहे.या सोहळ्यास तमाम परळीकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

        तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या  कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केलेल्या भरत गित्ते यांच्याशी संवाद व त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असुन या सोहळ्याची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. दावोस मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गेले होते आणि भरघोस आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. महाराष्ट्रातीलच त्यातही परळीचा भूमीपुत्र असलेला उद्योजक भरत गित्ते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. हा क्षण प्रत्येक परळीकरासाठी उर अभिमानाचा ठरला. परळीच्या मातीची खरी गुणशक्ती यानिमित्ताने अधोरेखित झाली.विविध क्षेत्रात कितीतरी असेच गुणी परळीकर आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवत आहेत. परळीच्या गुणशक्तीत अधिकाधिक वाढ व्हावी, अनेकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा सन्मान करण्यात येणार आहे.त्याचबरोबर त्यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे.

      लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर परळी वैजनाथ येथे आज रविवार दि.१६  फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. उद्योग जगतात तळपणार्या या परळीच्या ताऱ्याचा सन्मान होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी आत्मिय संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवण्यासाठी उद्योजक भरत गित्ते यांची परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व लेखक- साहित्यिक  प्रा.राजकुमार यल्लावाड हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्यास परळीकर म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक आपण सर्व परळीकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!