गेवराई शहर स्वच्छ व सुंदर आदर्श बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे :- अनिल बोर्डे


       
          

          गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई शहरामध्ये नगरपरिषद गेवराई यांच्याकडून विविध विकासाची कामे तसेच गेवराई शहरातील स्वच्छता व सुंदर आदर्श गेवराई शहर बनविण्यासाठी प्रशासकीय काळात विकासाला चालना मिळाली आहे. त्यांच्या काळात त्यांच्याबरोबरच नगरपरिषद गेवराई येथील इतर सर्व कर्मचारी वर्गाकडून सहकार्य मिळत असल्याचे निदर्शनाचे येत आहे. स्वच्छ सुंदर व आदर्श गेवराई निर्माण होण्यासाठी नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता नगर परिषदेतील गाडीत ओलावा व सुका कचरा व घातक कचरा नियमितपणे टाकणे आवश्यक आहे. तसेच शहरातील  नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यावर व नालीत कचरा टाकू नये. पान व तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकू नये. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक आहे कचरा नेहमी डस्टबिन मध्ये  टाकणे. सर्वांनी मिळून एकत्र येऊन नवी सुरुवात करू या अस्वच्छतेवर मात करूया एकच लक्ष गेवराई शहर स्वच्छ ठेवूया. पर्यावरण संबंधी योग्य कार्य चालू आहे तसेच गेवराई शहरामध्ये राजकीय पक्षांनी नगरपरिषद यांच्या परवानगीशिवाय होल्डिंग लावण्यात येऊ नयेत असे वारंवार नगरपरिषद सांगण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांनी व होल्डिंग लावणाऱ्या नागरिकांनी नगरपरिषद ठरविण्यात आलेल्या जागेवरच जागी होर्डिंग लावणे बंधनकारक आहे. गेवराई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था सर्वांनी पाळणे आवश्यक आहे . गेवराई शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकाला तसेच महिला वर्गांना व इतर नागरिकांना आपल्या वाहनाचा त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेणे गरजेचे आहे.  तसेच पंचायत समिती समोरील रोड व शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे वाहनधारकांनी वाहने सावकाश चालविणे आवश्यक आहे . सध्या मार्च महिन्यात वसुली सुरू असल्यामुळे नगरपरिषदेतील कर्मचारी वर्ग वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे त्यांना सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. गेवराई शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडील घरपट्टी व नळपट्टी तसेच नाळेधारकांनी त्यांच्याकडील थकबाकी रक्कम जमा करणे आवश्यक आहे असे झाले नाही तर विकासाला चालना मिळणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रम मांडुरगे प्रशासक यांनी त्यांच्या कर्तव्य कालावधीत योग्य प्रकारे व शासन निर्णयाप्रमाणे नगरपालिकेचा कारभार करून जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. हे सर्व कार्य करीत असताना मा. प्रशासक प्रसिद्धी माध्यमातून अलिप्त आहेत. मा . प्रशासक व नगरपरिषद येथील सर्व टीम कर्मचारी वर्ग मनापासून कार्य करीत आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.  तरी सर्व नागरिकांनी त्यांच्या कडील थकबाकी रक्कम भरून सहकार्य करावे. नगरपरिषद गेवराई येथील सर्व नियमाचे पालन होणे आवश्यक आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सर्वांनी पाळावी असे आवाहन बीड जिल्हा बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा गेवराई मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे, गेवराई  ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार