स्वा.सै. चिल्ले गौरव आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रूपाली साखरे प्रथम, लक्ष्मी जुनाळ द्वितीय व वैष्णवी गित्ते तृतीय
परळी वैजनाथ-
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेतर्फे नुकत्याच परळी येथे पार पडलेल्या स्वा.सै. मन्मथअप्पा व सौ.कलावतीबाई चिल्ले गौरव आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रूपाली संतोष साखरे ही प्रथम , वैद्यनाथ महाविद्यालयाची कु. लक्ष्मी महेश जुनाळ ही द्वितीय आली, तर तिसरा क्रमांक याच महाविद्यालयाच्या कु. वैष्णवी नागनाथ गित्ते हिने पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी ऐश्वर्या जगन्नाथ पोटभरे, कोमल विनायक कराड, तेजस्विनी दत्तात्रय साबळे व चि. फरहान खान या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील आर्य समाजात आयोजित या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे कोषाध्यक्ष श्री देविदासराव कावरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून करनाल (हरियाणा) गुरुकुल आश्रमाचे आचार्य श्री स्वामी सोमानंद सरस्वती , महाराष्ट्र सभेचे कोषाध्यक्ष श्री रंगनाथ तिवार व आर्य समाजाचे उपप्रधान श्री लक्ष्मण आर्य गुरुजी उपस्थित हे उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण श्रद्धानंद गुरुकुल आश्रमाचे आचार्य श्री सत्येंद्रजी विद्योपासक,पं.प्रशांतकुमारजी शास्त्री व पं. योगराज भारती यांनी केले. या स्पर्धेसाठी "समग्र क्रांतीचे अग्रदूत महर्षी दयानंद व सद्य परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज !" हा विषय ठेवला होता विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम (₹२०००/-), द्वितीय(₹१५००), तृतीय(₹१०००) व उत्तेजनार्थ (प्रत्येकी ₹ ५००/- ) अशी पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे प्रास्ताविक लक्ष्मणराव आर्य यांनी केले,संचलन अरुण चव्हाण यांनी केले तर आभार सभेचे कोषाध्यक्ष श्री रंगनाथ तिवार यांनी मानले. आर्य कार्यकर्ते श्री गोवर्धन चाटे, डॉ.अरुण चव्हाण, डॉ .नयनकुमार आचार्य व रंगनाथ तिवार यांच्याकडून प्रत्येकी ₹५००/- रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्वामी सोमानंदजी यांनी सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या चरित्र व ग्रंथांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा