वैद्यनाथ कॉलेजमध्ये ग्रामीण साहित्याचे शिलेदार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण
--------------------------------------
परळी वैजनाथ, दि. 12
परळी शहरातील प्रतिष्ठित वैजनाथ कॉलेजमध्ये ग्रामीण साहित्याचे शिलेदार, प्रसिद्ध कथा, कादंबरी, नाटक व समिक्षा, तथा बालसाहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने मराठी ग्रामीण साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांनी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण, आयाम दिले. बोराडे सर यांनी अस्सल मराठवाड्यातील भाषा, पात्र व आशय घेऊन गेली सहा दशके लेखन केले आहे. त्यांचे साहित्य खेड्यातील जीवन, संघर्ष, संस्कृती आणि संवेदना यांचे जिवंत चित्रण करणारे असून खास "मराठवाडीपाणा" व्यक्त करते.
या निमित्ताने बोराडे सर यांच्या मराठी साहित्याचा आढावा मराठी विभागातील प्रोफेसर डॉ. रा. ज. चाटे यांनी घेतला; तर यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अ. रा. चव्हाण, उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे प्रोफेसर व्ही. बी. गायकवाड प्रोफेसर पी. एल. कराड उपप्राचार्य हरीश मुंडे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम मराठी विभागातर्फे घेण्यात आला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा