परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 ॲड. माधव जाधव यांना अमेरिकेतील विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल 

अंबाजोगाई:( वसुदेव शिंदे):- अंबाजोगाई येथील शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या २५ वर्षापासून अविरतपणे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे *जाधव कोचिंग क्लासेसचे संस्थापक* तथा *छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष ॲड.माधव लिंबाजी राव जाधव यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी* या विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रातील *मानद डॉक्टरेट इन एज्युकेशन* ही पदवी बहाल करण्यात आली.यामुळे *ॲड माधव जाधव हे आता वकिली व्यवसायासोबतच डॉक्टर सुद्धा बनलेले आहेत.* 

 *ॲड माधव जाधव* हे अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर सारख्या ग्रामीण भागातून उच्चशिक्षित झालेले तरुण असून त्यांचे शिक्षण हे *MA इंग्रजी बीएड व एलएलबी* असे पूर्ण झालेले आहे. *ॲड माधव जाधव* यांनी लाडझरी ती.परळी वै. येथील नागेश्वर विद्यालय येथे दोन वर्ष सहशिक्षक म्हणून नोकरी केलेली होती.तसेच घाटनांदुर येथे जाधव कोचिंग क्लासेस ची सुरुवात करून २००१ मध्ये अंबाजोगाई येथे जाधव कोचिंग क्लासेसची स्थापना केली व जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन करण्याचे काम *ॲड माधव जाधव* यांनी गेल्या २५ वर्षापासून आंबेजोगाई तालुक्यांमध्ये केलेले आहे. *जाधव कोचिंग क्लासेसच्या* माध्यमातून अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस मध्ये सवलत देऊन अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा आधार *ॲड माधव जाधव* यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेला आहे . *जाधव कोचिंग क्लासेस च्या संचालिका सौ ज्योती जाधव मॅडम तसेच प्रा. संतोष देशमुख सर , प्रा. योगेश तट सर,  प्रा. रमेश कुलकर्णी सर,प्रा. श्रीकांत खुणे सर* व इतर सर्व सहकारी यांच्या सहकार्याने जाधव कोचिंग क्लासेस हे अविरतपणे अंबाजोगाई मध्ये शिक्षणाची सेवा देत आहेत.

त्याचप्रमाणे *ॲड माधव जाधव यांनी जयभारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठानची* स्थापना करून जय भारती सेवा प्रतिष्ठान संचलित *छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज* ही सीबीएससी बोर्डाची शाळा अंबाजोगाई येथे सन २०११ पासून सुरू केलेली असून सध्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएससी बोर्डाची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने *ॲड माधव जाधव हे त्यांचे सहकारी प्राध्यापक सुनील साळुंखे सर, ॲड अनिल लोमटे,जीडी थोरात साहेब,राजू शेठ भन्साळी,आतिक भाई ,ईंजी. परमेश्वरजी भिसे,आर पी चव्हाण सर, ॲड.श्रीनिवास अंबाड, ॲड.बाळासाहेब अंबाड, ईशरत मोमीन मॅडम*  व इतर सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन अंबाजोगाई येथे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सततपणे प्रयत्न करत आहेत.

 ॲड. माधव जाधव यांनी इंग्रजी विषयाचे ग्रामर चे पुस्तक स्टेप बाय स्टेप अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी ग्रामर समजण्यासाठी स्वतः प्रकाशित केलेले असून इंग्रजी व्याकरणाचे *युट्युब वर लेक्चर सुद्धा ॲड माधव जाधव* यांचे आहेत.वकीली व्यवसायासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये अविरतपणे गेल्या 25 वर्षापासून कार्यरत असलेल्या ॲड माधव जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट ईन एज्युकेशन ( Docotrate in Education ) ही पदवी नुकतीच *अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी यांच्या वतीने बहाल करण्यात आली.शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी समर्पित आणि संस्थात्मक विकासात मोलाचा वाटा उचलणारे आदरणीय अध्यक्ष ॲड. माधव लिंबाजीराव जाधव* यांनी शिक्षण क्षेत्राचा नवा चेहरामोहरा घडवण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.    


हा सन्मान त्यांच्या अविरत समर्पणाची आणि शिक्षण क्षेत्रातील प्रभावी कार्याची साक्ष देतो. संपूर्ण व्यवस्थापन, संपुर्ण मित्र परिवार, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!