महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी बालाजी ढगे, कार्याध्यक्ष बाबासाहेब किरवले तर प्रधान सचिव विकास वाघमारे यांची निवड
परळी प्रतिनिधी.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या अध्यक्षपदी बालाजी ढगे यांची तर कार्याध्यक्षपदी बाबासाहेब किरवले तर प्रधान सचिव पदी विकास वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या नूतन कार्यकारणी निवडीसाठी नुकतेच जिजामाता उद्यान परळी येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा प्रधान सचिव सुकेशनी नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस ज्येष्ठ पदाधिकारी प्रा. दासू वाघमारे, प्रा. विलास रोडे, रानबा गायकवाड जिल्हा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजीब रॉय आदी उपस्थित होते.
नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष रफिक पठाण, उपाध्यक्ष विजय आटकोरे ,विविध उपक्रम विभाग रानबा गायकवाड, वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग सुरेश जाधव, बुवाबाजी संघर्ष विभाग दिपक शिरसाठ, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग रतन उजगरे, विवेक जागर प्रशिक्षण व वितरण विभाग अशोक मुंडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग विठ्ठल झिलमेवाड, निधी व्यवस्थापन विभाग नवनाथ दाणे ,महिला सहभाग सुनिता नरंगलकर ,युवा सहभाग महादेव आजले व संदीप मस्के, संस्कृतिक अभिव्यक्ती विभाग राहुल सूर्यवंशी ,मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग डॉ.आकाश वाघमारे, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग ॲड .बुद्धरत्न उजगरे ,जातपंचायत मूठ माती विभाग केशवराज मुंडे ,मिश्र विवाह प्रोत्साहन विभाग प्रा.दशरथ रोडे, जोडीदाराची विवेकी निवड अरुण जाधव ,सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग सय्यद सबाहत अली ,विज्ञान बोधवाहिनी विभाग प्रा. प्रदीप बुकतर, विवेक वाहिनी भगवान राठोड, राष्ट्रीय समन्वय विभाग जी .एस.सौंदळे, दस्तावेज संकलन विभाग अभिमन्यू घोबाळे आदींची निवड करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजीब रॉय, जालिंदर गिरी, गुलाबराव देवकर, गोपाळ आघाव,आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा