पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचा आज सायंकाळी पालखी सोहळा; नगर प्रदक्षिणेत प्रभू वैद्यनाथाच्या स्वागतासाठी गावभागात उत्साह
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभु वैद्यनाथाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे महाशिवरात्रीचा पर्वकाळ असतो. या अनुषंगाने महाशिवरात्रीच्या पर्व काळातील प्रमुख व समारोपाचा उत्सव म्हणजे पालखी सोहळा असतो. आज दि. 28 रोजी सायंकाळी सहा वाजता पारंपारिक पद्धतीने प्रभु वैद्यनाथाचे पालखी सोहळ्याचे मंदिरातून प्रस्थान होईल. मंदिरातून पालखी सोहळा निघाल्यानंतर वैद्यनाथ गल्ली- देशमुखपार येथे विसावा होईल. या ठिकाणी लोक कलावंतांची हजेरी या पारंपारिक कार्यक्रमांतर्गत पुणे येथील प्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर यांचे भावगीत व भक्तीगीत गायन सादरीकरण कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमानंतर देशमुख पारापासून प्रभू वैद्यनाथचा पालखी सोहळा गाव भागाकडे मार्गस्थ होईल. देशमुखपार ते अंबेवेस दरम्यान सरस्वती चौक येथे पारंपारिक पद्धतीने शोभेची दारू उडवून पालखी सोहळ्याचा पारंपारिक झगमगाट साजरा होईल. अंबेवेस, गणेशपार, नांदूरवेस मार्गे पालखी सोहळा मार्गस्थ होईल. दरम्यानच्या मार्गावर पारंपारिक पद्धतीने लोककलावंत हजेरी होईल.रात्री उशिरा हा पालखी सोहळा परत वैद्यनाथ मंदिरात पोहोचेल. दरम्यान या पारंपरिक पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी परळी शहरातील शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा