परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात स्वच्छता मोहीम राबवा : व्यंकटेश शिंदे
महाशिवरात्रीपुर्वी जुन्या शनी मंदिर समोरील अनधिकृत अतिक्रमण काढा
परळी: (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देश भरातून लाखों भाविक येत असतात. महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात परळी नगर परिषदेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून पथदिवे दुरुस्त करण्यात यावेत असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे.
परळी शहरात धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धूळ मुक्त परळी करण्यासाठी परळी नगर परिषदेने ठोस पाऊले उचलावीत. महाशिवरात्री निमित्त प्रभु वैद्यनाथा च्या निघणाऱ्या पालखी मार्गावर शनी मंदिर समोर आतिषबाजी करण्यात येणाऱ्या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमण होत असून त्यावर नगर परिषदेने कठोर कार्यवाही करावी. तथा संपूर्ण पालखी मार्ग खड्डे मुक्त करून स्वच्छ करावा. संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. महाशिवरात्री दरम्यान जड वाहतूक शहराच्या बाहेरून पर्यायी मार्गाने वळवावी. महाशिवरात्र सुरू होण्यापूर्वी वरील सर्व कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा