वसंतदादा पाटील महाविद्यालयात शिवजयंती साजरी
अमोल जोशी / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशाबा साळुंके, प्रा. मनिषा गाढवे, प्रा. विमल अलापुरे, प्रा. दत्तात्रय शिनगारे, प्रा. प्रदीप मांजरे, प्रा. मुख्तारखान पठाण, बाळासाहेब चौरे, बाबासाहेब नाईकनवरे, बाबासाहेब मुंडे, अशोक कोरडे, ज्ञानदेव पवार, शहाजी जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुशाबा साळुंके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. प्रदीप मांजरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा