प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देणार

मसाजोगचे ग्रामस्थ 25 फेब्रुवारी रोजी करणार अन्नत्याग आंदोलन !

प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देणार 


बीड : केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असला तरी काही मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. यामध्ये दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करणे तसेच कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करणे यासह इतर मागण्या पूर्ण न झाल्यास पंचवीस फेब्रुवारी रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे..


मसजोग येथे सोमवारी सायंकाळी बैठक पार पडली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.. सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती.. या प्रकरणात नऊ आरोपी असून आतापर्यंत केवळ आठ आरोपींना अटक झाली आहे.. एक आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 68 दिवसापासून फरार आहे. त्याला अटक करावी या प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईसाठी उज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नियुक्ती करावी तसेच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करावे, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुले यांना देखील चौकशी करून आरोपी करावे यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात येणार असून त्या मागण्या येत्या 25 तारखेपर्यंत पूर्ण झाल्यास सर्व गावकरी एक दिवस अन्न त्याग आंदोलन करणार आहेत. दरम्यान उद्या मसाजोग येथे सुप्रिया सुळे यादेखील भेट देणार असून त्यांच्यापुढे देखील या मागणी मांडण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

-------- live video पहा👇👇

https://www.youtube.com/live/5RMIZzLSiII?si=DgNtPR4GJfXWNX0O











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !