उक्कडगाव (म.) येथे वार्षीक स्नेह संमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
भाई उध्दवराव पाटील विद्यालय उक्कडगाव (म.) येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचे व खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह संमेलनाच्या उद्घाटक म्हणुन संस्थेच्या जेष्ठ संचालीका श्रीमती चित्राताई काशिनाथराव गोळेगावकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख उखळी चे श्री. बेले सर तर प्रमुख पाहुने सौ. यशश्रीताई मोरे सरपंच उक्कडगाव (म.) समवेत सी. संजिवणीताई मोरे मा. सभापती पंचायत समिती सोनपेठ व्यासपीठावर सत्कार मुर्ती म्हणून भिसे गोरखनाथ लघु लेखक जिल्हा सत्र न्यायालय, जालना, नाथराज करटुले प्रा.शि. जोडपरळी आर.बी. बचाटे उपाध्यक्ष तालुका ग्रामीण पत्रकार संघ गंगाखेड, रविंद्र जोशी एम.बी. न्युज परळी वै. या सत्कार मुर्तीचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास गावचे मा. सरपंच श्रीकांतराव मोरे, भाऊसाहेब मोरे करमचे सरपंच नारायण बदाले, राहुल जाधव, जाधव सर मु. अ. जि.प. उक्कडगाव हे सर्व मान्यवर मंडळी चा ही सत्कार करण्यात आला.या प्रसंगी श्रीमती चित्राताई यांचा गावचे सरपंच यशश्रीताई मोरे व माजी सभापती संजिवनी ताई मोरे यांनी व गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती चित्राताई यांनी आपले मनोगत व्यक्त करातांना असे सांगीतले की, बळीराजा शिक्षण संस्थेची स्पापनाच मुळात ग्रामीण भागतल्या होतकरून मुला मुलींसाठी करण्यात आली आहे. गावाला शाळेचा अभिमान असावा अभिमान असेल तरच शाळेतील मुले चांगली गुणवत्ता पुर्ण तयार होतील. व अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातुन या चिमुकल्यांच्या विविध कलागुणांना ईच्छितच आपल्या माध्यमातुन संधी मिळेल अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे नियोजन पाहुन गावकऱचे खुप आभारही मानले व समाधान व्यक्त करून त्या सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी 26 जानेवारी प्रजाकसत्ताच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाचे पारितोषीक वितरीत करण्यात आले. सर्व प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शैक्षणिक साहित्य देवुन मान्यवराच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिसे गावातील शिक्षण प्रेमी व माजी विद्यार्थी यांनी उपलब्ध करून दिली. भारतीय सैनिक कादर अजमोद्दीन शेख, गजानन सरवदे, राजाराम पुरी यांनी वरील सर्व बक्षिसे देवुन विद्यार्थ्यांचे प्रोत्सान वाढवले.
याप्रसंगी भाई उध्दवराव पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. मुंढे सर व त्यांचे सर्व कर्मचारी वृंदाचा जि.प. प्रा.शा. उक्कडगाव चे मुख्यध्यापक जाधव सर व खांडेकर मॅडम आरोग्य सेविका त्यांचा सर्व कर्मचारी वृंदाचा गावचे सरपंच मुंजाभाऊ मोरे यांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी, गावातील नागरीक यांनी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आनंद घेण्यासाठी गावातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जि.प.शाळा उक्कडगाव चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद शेरकर, अजय कोदवडकर, इंद्रजित मोरे, प्रल्हादभाऊ गोरे, सचिन जाधव, किशोर मोरे व विद्यालयातील सर्व कर्मचारी दिवसे सर, कोरे सर, तिवार झाहेब, घोबाळे मॅडम, परमेश्वर मोरे, संजय सपुरे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. तर या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्र संचालन अभिमान मुंढे सर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा