इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

करुणा व धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव काय म्हणाला?

करुणा - धनंजय मुंडे वादावर त्यांच्या मुलाने पहिल्यांदाच मांडली भूमिका; वडिलांची घेतली बाजू


परळी वैजनाथ,एमबी न्यूज वृत्तसेवा..

       धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. करूणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुरु झालेल्या चर्चेवर करुणा व धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट करत  आपली भूमिका मांडली असुन त्याने आपल्या वडिलांची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे.

   

करुणा व धनंजय मुंडे यांचा १८ वर्षांचा मुलगा शिशीव धनंजय मुंडे याने पोस्ट टाकून खालील प्रमाणे खुलासा केला आहे.


मी शीशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे.


 माझा बाप जगातला सर्वोत्कृष्ट बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता.  माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची.

 

जो घरेलू हिंसाचार तिच्यासोबत झाला असा ती दावा करते तो घरेलु हिंसाचार खरे तर मी, माझी बहीण व माझे वडील यांच्यासोबत तिच्याकडून व्हायचा.


 माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला व माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितले कारण तिच्या मते तिचा व आमचा ( जन्मदाती आई असुनही) काहीही संबंध राहिला नव्हता.  


2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत.


 माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असते.


 *शिशिव धनंजय मुंडे*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!