दुःखद वार्ता : पत्रकार रामप्रसाद शर्मा यांना पुत्रशोक; गोपाल शर्मा याचे अकाली निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद उर्फ बबडू शर्मा यांचे चिरंजीव गोपाल शर्मा यांचे शुक्रवार दि. ७ रोजी पहाटेअल्पशा आजाराने अकाली निधन झाले. अगदी तरुण व उमेदीच्या वयातील निधनामुळे आप्तस्वकीय,स्नेही, मित्रपरिवारासाठी मन हेलावून टाकणारी अशी ही घटना घडली आहे.
गोपाल रामप्रसाद शर्मा याचे किडणी प्रत्यारोपण झालेले होते. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठणठणीत होत असतानांच अचानक काळाने घाव घातला.छत्रपतीसंभाजीनगर येथे उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.मृत्युसमयी त्याचे अवघे वय २४ वर्षे होते. त्याच्या पश्चात आई, वडिल, बहिण, आजी असा परिवार आहे. एकुलत्या एक असलेल्या मुलाचे अकाली निधन झाल्याने शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शर्मा कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा