ऊसतोड मजूराच्या पाठिशी ना. पंकजा मुंडे खंबीरपणे उभ्या
वारोळा तांडयाच्या राठोड परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान देणार मदतीचा हात
ऊसतोड मजूराच्या पाठिशी ना. पंकजा मुंडे खंबीरपणे उभ्या
बीड ।दिनांक ०३।
वारोळा तांडा (ता.माजलगांव) येथील ऊसतोड मजूर अनिल व आरती राठोड यांच्या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मदतीचा हात देणार आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी राठोड कुटुंबियांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे.
शेवगाव येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जात असतांना झालेल्या रस्ता अपघातात वारोळा तांडा येथील अनिल राठोड व आरती राठोड या दाम्पत्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पश्चात कुटुंबात आई वडिल आणि दोन लहान मुले आहेत. राठोड पती पत्नीच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशा परिस्थितीत ना. पंकजाताई मुंडे त्यांच्या पाठिशी भक्कम उभ्या असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मदत करणार आहेत. लवकरच ही मदत त्यांच्यापर्यंत पोचवली जाईल. दरम्यान सरकारकडून देखील राठोड परिवाराला मदत मिळवून देण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे प्रयत्न करत आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा