पंकजा मुंडेंकडे पक्षाकडून बीडचे 'ही' महत्त्वपूर्ण जबाबदारी

 ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत तिथे भाजपकडून 'जिल्हा संपर्कमंत्री' 

बीड दि. ४ (प्रतिनिधी) : ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, त्या जिल्ह्यांमध्ये भाजपने आपल्या काही मंत्र्यांना संपर्कमंत्री केले आहे. पक्ष आणि सरकारमधील संपर्काची जाबाबदारी या संपर्क मंत्र्यांवर असणार आहे. यात बीड जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य भाजपच्या बैठकीत पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. जेथे इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत, तेथे भाजपने मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांकडे एकप्रकारचे जिल्ह्याचे भाजपचे पालकत्वच असणार आहे. बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोड़ीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला महत्व आहे.

        विशेष म्हणजे उद्या आष्टी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला देखील पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.आष्टी येथील कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम असून आपण शासन म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी आज सकाळीच केली होती, त्यानंतर आता त्यांच्याकडे पक्षाच्या संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

 जिल्हा आणि संपर्क मंत्री 

    गोंदिया- पंकज भोयर बुलढाणा - आकाश फुंडकर यवतमाळ - अशोक उईके वाशीम - राधाकृष्ण विखे संभाजीनगर - अतुल सावे बीड - पंकजा मुंडे धाराशिव - जयकुमार गोरे हिंगोली - मेघना बोर्डीकर जळगाव- गिरीश महाजन नंदुरबार - जयकुमार रावळ मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा ठाणे - गणेश नाईक रत्नागिरी- आशिष शेलार कोल्हापूर माधुरी मिसाळ पुणे चंद्रकांत पाटील

नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू - पंकजा मुंडे

संघटन आणि सरकार यांच्यात समन्वय साधावा यासाठी संपर्कमंत्र्यांची घोषणा करताना पक्षाने माझी बीडची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ही नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार