या माजी सैनिकाने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या गाडीवर पाच वर्षे चालक म्हणून केली होती सेवा
वयोवृद्ध माजी सैनिकाला परळीच्या बस स्टँडवर'गुलीगत धोका': गावचा ग्रामसेवक असल्याचे भासवून केली फसवणूक
परळी वैजनाथ दि.२७ (प्रतिनिधी)
परळीत सध्या वेगवेगळ्या बतावण्या करुन लुटमार व फसवणूक करण्याचे बरेच प्रकार घडतांना दिसत आहेत. असाच एक प्रकार एका वयोवृद्ध माजी सैनिकाबरोबर घडला. परळीच्या बसस्थानकात प्रवासासाठी निघालेल्या पती पत्नीला काही कळण्याआधीच त्यांची रोख रक्कम ४ हजार फसवणूक करुन लुटून नेण्यात आली.फसवणूक करणारा, त्याच्या बतावणीला बळी पडलेलं हे जोडपं आणि घडलेला प्रसंग व झालेली फसवणूक एखाद्या '४२०' चित्रपटाच्या कथेपेक्षाही कल्पक दिसुन येते.
परळी वैजनाथ बसस्थानकात गुरुवारी (दि.२७) सकाळी ८ च्या दरम्यान घडलेली ही कथानक वाटावी पण प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. नागदरा (ता.अंबाजोगाई) येथील वयोवृद्ध माजी सैनिक अंकुश नागरगोजे (वय ६५) हे त्यांची पत्नी मिना नागरगोजे यांच्यासह आपल्या मुलीला भेटण्यासाठी माणगाव जिल्हा रायगड येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्थानकात थांबले. बसची वाट बघत असतांना एक अनोळखी व्यक्ती इतक्या आत्मियतेने जवळ आला.रामराम झाला. घनिष्ठ दाट ओळख असल्याचे त्याने या वयोवृद्ध जोडप्याशी वर्तन केलं.ओळखलं की नाही असे म्हणत मी तुमच्या गावचा ग्रामसेवक आहे की,ओळखीनंपण झालात असे सांगितले. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. त्यांना आणखी ओळखीचं वाटावं व आपली बतावणी पटावी म्हणून फोनवर बोलण्याचा दिखावा करुन गावातीलच कोणत्यातरी प्रमुख व्यक्तीला फोन लावल्यासारखे बोलणे व गावातील काही गोष्टी बोलल्याने हे वयोवृद्ध जोडपे ओळखत नसले तरी त्याच्या बतावणीला बळी पडले.
त्यांना खात्री पटली असल्याचेलक्षातयेताच लगेच चला मामा चहा घेवू म्हणत या फसव्याने माजी सैनिक अंकुश नागरगोजे यांना बसस्थानकाबाहेरील हाँटेलमध्ये घेवून गेला. चहाची ऑर्डर दिली. बाईंना ( माजी सैनिक अंकुश नागरगोजे यांची पत्नी मिना नागरगोजे यांना) चहा पाहिजे का काँपी विचारुन येतो म्हणून बसस्थानकात गेला. बसस्थानकात मिना नागरगोजे यांना भेटला व तुमच्या मालकानी (पतीने) चार हजार रुपये सांगितले आहेत. ते बाहेर हाँटेलमध्ये बसले असल्याचे सांगत पैसे घेतले व पोबारा केला. अंकुश नागरगोजे हाँटेलमध्ये वाट पाहत बसले होते बराच वेळ झाला तो आला नाही म्हणून बसस्थानकात परत आपल्या पत्नीकडे आले असता पत्नीने विचारले तुम्ही पैसे का मागितले. अंकुश नागरगोजे यांनी सांगितले की मी पैसे मागितले नव्हते. पैसे घेणारा तर गायब झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे दोघांच्या लक्षात आले. मिना नागरगोजे यांनी टाहो फोडला. अंकुश नागरगोजे यांनी पत्नीस समजावून शांत केले. त्यानंतर दोघे पोलीस ठाण्यात आले.आपली अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या गाडीवर पाच वर्षे चालक म्हणून केली सेवा
अंकुश नागरगोजे माजी सैनिक असून त्यांनी देशात अनेक ठिकाणी सेवा दिली आहे. विशेष म्हणजे दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या गाडीवर पाच वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. दरम्यान शहरात बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात अशा अनेक घटना घडल्या असून फसवणूकीचा नवीन प्रकार सुरू झाला आहे. वयोवृद्ध व्यक्ती पाहून अशा प्रकारची फसवणूक होत आहे. पोलीसांनी याकडे लक्ष देवून वेळीच अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना जेरबंद केले पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा