इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विद्यार्थ्यांकडून विविध कला गुण सादर

 फिनिक्स इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात 

 पाटोदा/ अमोल जोशी......  

         शहरातील फिनिक्स इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 10 फेब्रुवारी  रोजी  रेणुका माता मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   कर्नल कल्याणराव डोरले तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा दिपाली राजू जाधव , मुख्याध्यापक तुकाराम तुपे, कवियत्री सुरेखा खेडकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, नगरसेवक उमर चाऊस, मुख्याध्यापक जाधव एल. आर., घुमरे सर, हे उपस्थित होते. 

       कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून या स्नेहसंमेलाचे उद्घाटन करण्यात आले ,यावेळी  कर्नल डोरले साहेब यांनी शुभेछा पर मनोगत व्यक्त केले.  शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कला गुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी भक्ती गीते , लोकगीते, विविध वेशभूषा , विविध विषयावर विद्यार्थ्यांनी कला सादर केल्या कार्यक्रमास शहरातील नागरिक ,पालक , मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टेज डेकोरेशन व लाईट सजावट रुपेश नाईकनवरे यांनी केले . 

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्या वर्षा सुहास झानपुरे एकबोटे , अस्मिता देशमुख, प्राजक्ता कुलकर्णी , जया डोरले , गिराम प्राची,शिरीष अनवणे, सुहास झानपुरे यांनी मेहनत घेतली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!