परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
मान्यवरांची उपस्थिती, राज्यभरातून पदाधिकारी मुंबईत येणार
मुंबई (प्रतिनिधी): राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ सोहळा, तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सन्मान व पदग्रहण सोहळा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी, रविवारी संध्याकाळी ४ वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास राज्यभरातून अनेक पत्रकार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटावा अशा उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच जणांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये व्यंकटेश जोशी – सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ, सीमा सिंग – सामाजिक कार्यकर्त्या व संस्थापक, मेघाश्रेय फाऊंडेशन, वैभव वानखडे – सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक व ‘कल्लोळ’ निर्माते, डॉ. विजय दहिफळे – प्रसिद्ध विचारवंत व आरोग्यतज्ज्ञ, शिवाजी बनकर – सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ठ. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२४ या पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून २४०० पत्रकारांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातून दिलीप वैद्य – पत्रकार, जळगाव, सुरज कदम – पत्रकार, परभणी, संदीप खडेकर – पत्रकार, यवतमाळ,बाळासो पाटील – पत्रकार, कोल्हापूर, वृषाली पाटील – पत्रकार, मुंबई. यांची निवड झाली आहे.
या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार व तालिका अध्यक्ष, राज्यसभा, दिल्ली असतील. तसेच प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये – मंगलप्रभात लोढा – मंत्री, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता, प्रताप सरनाईक – परिवहन मंत्री, मा. गणेश नाईक – वनमंत्री, हेमंत पाटील – विधान परिषद सदस्य व अध्यक्ष, हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र, ब्रिजेश सिंह – महासंचालक व सचिव, माहिती व जनसंपर्क, रुपाली चाकणकर – अध्यक्ष, राज्य महिला आयोग, अमृता फडणवीस – बँकर, गायिका व सामाजिक कार्यकर्त्या, अशोक काकडे – जिल्हाधिकारी, सांगली, संदीप भाजीभाकरे – पोलिस उपायुक्त, पुणे, राजश्री पाटील – अध्यक्ष, गोदावरी समूह व पुरस्कार निवड प्रक्रिया प्रमुख, विशाल पाटील – संपादक, लोकशाही, आशितोष पाटील – संपादक जय महाराष्ट्र, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, इंटरनॅशनल चीफ गगन महोत्रा, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आदी मान्यवर येणार आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित राहून पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन दिगंबर महाले सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया,योगेंद्र दोरकर, मंगेश खाटीक, विजय चोरडिया, कार्याध्यक्ष, अजितदादा कुंकूलोळ उपाध्यक्ष यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा