इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाशिवरात्र पर्व:अधिकृत माहिती नाही पण वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनातील बैठक वैद्यनाथ मंदिरात पार पडल्याची माहिती समोर!

परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....
        येत्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वावर देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात.या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दोन तीन दिवस होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोयीसुविधा, यात्राकाळातील आवश्यक बाबी, प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा आदींची  पुर्वतयारी केली जाते.या अनुषंगाने आज  वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनातील बैठक वैद्यनाथ मंदिरात पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?,आवश्यक बाबी कोणत्या ? पूर्वतयारीचा नेमका काय आढावा झाला? याबाबत अद्याप जिल्हा प्रशासन अथवा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.मात्र वैद्यनाथ मंदिरात आज झालेली बैठक दरवर्षीप्रमाणेच  महाशिवरात्रीनिमित्तच झाली असण्याची दाट शक्यता आहे.
            बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ परळी वैजनाथ येथे आहे २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या अनुषंगाने महाशिवरात्र उत्सवाची पूर्वतयारी प्रशासकीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज वैद्यनाथ मंदिरात घेण्यात आली आहे.या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय अधिकारी परळी,पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार परळी , सचिव व सर्व विश्वस्त,  पोलिस अधिकारी,नगर परिषद,अन्न व औषधी प्रशासन, वीज वितरण, एस.टी. महामंडळ आदी विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
              प्रभु वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री पर्वावर देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यामुळे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टला मोठी तयारी दरवर्षीच करावी लागते. या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे संपूर्ण मंदिर परिसर बंदिस्त करण्याची कामे सध्या दिसत आहेत. लोखंडी जाळ्या,दर्शनरांगा नीट व्हाव्यात यासाठीचे बॅरिकेटिंग, मोठी गर्दी लक्षात घेऊन दर्शनव्यवस्था, अन्य नियोजन नेहमीप्रमाणेच वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून सध्या सुरु असल्याचे दिसुन येत आहे. या अनुषंगानेच वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासनातील बैठक वैद्यनाथ मंदिरात पार पडल्याची माहिती समोर आली असली तरी अतिशय गोपनीयरित्या झालेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण सुचना, काळजी, येणाऱ्या भाविकांसाठीच्या सोयीसुविधा,वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांनी पार पाडावयाची कर्तव्ये, जबाबदार्‍या यावर गुप्तगू व साधकबाधक चर्चा या बैठकीत झाली असण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीबाबत आणि या बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्याविषयी  अद्याप जिल्हा प्रशासन अथवा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारची एक बैठक मात्र झाल्याची खात्रीशीर माहिती आहे.
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!