परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जखमीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार

......तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देत लोखंडी राॅड,कोयत्याने हल्ला

जखमीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार 

धारूर,प्रतिनिधी..

धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील तरनळी येथे 5 फेब्रुवारी रोजी दुपारी वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत गावातील दोन युवकांनी तरनळी येथील अशोक मोहिते याला लता बुक्क्या , लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करून जखमी केले असून तो रुग्णालयात उपचार घेत असून त्याचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये 2 जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील व केज तालुक्यातील तरनळी गावामध्ये 5 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता गावातील रमाई चौक या ठिकाणी अशोक शंकर मोहिते हा मोबाईल वर व्हिडिओ पाहत असताना गावातील एका लाल रंगाच्या MH 44 R 9294 या मोटार सायकलवर वैजनाथ भारत बांगर , अभिषेक सिद्धेश्वर सानप हे दोघे आले व त्यांनी अशोक मोहिते याला लाथाबुक्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण केली व यापुढे वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी अशोक मोहीते याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार चालू आहे . मोहिते यांचा मावस भाऊ बालासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप व बांगर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!