परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर समारोप

 रा.से. यो. शिबिरातून युवकांनी स्वयंशिस्त अंगीकारावी- दत्ताआप्पा इटके 

शिस्तप्रिय विद्यार्थी हे समाजाचा आधार – प्राचार्या  . डॉ. चव्हाण 



वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर समारोप 


परळी वैजनाथ – वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना  विभागातर्फे आयोजित विशेष युवक युवती शिबिर शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जव्हार एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय श्री दत्ताआप्पा इटके गुरुजी होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या सौ. डॉ. अर्चना चव्हाण,  उप प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड,  उप प्राचार्य प्रा. डी. के. आंधळे,  डॉ. बी. व्ही. केंद्रे व विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधव रोडे व  डॉ. भीमानंद गजभारे, श्री स्वामी सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी   डॉ. गजभारे यांनी शिबिराची साध्य झालेली उद्दिष्टे सांगितली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  श्री दत्ताआप्पा इटके गुरुजी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सामाजिक जाणीवेवर भर देत म्हटले की, "एनएसएस हे समाजकार्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. हे विद्यार्थ्यांना सेवा करण्याची संधी देते आणि त्यातून आयुष्यभराची शिदोरी मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला स्वभाव अंगीकारणे आवश्यक आहे. आई-वडील हेच आपले पहिले दैवत आहेत, त्यामुळे त्यांची योग्य सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. एनएसएसमधून आदर्श नेतृत्व घडते आणि यामुळे विद्यार्थी उत्तम नागरिक बनतात." कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्या  डॉ. अर्चना चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. "शिस्तप्रिय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणे हे एनएसएसचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टींचे मनात रेकॉर्डिंग ठेवावे, त्यामुळे त्यांची योग्य दिशा ठरते," असे मत त्यांनी व्यक्त केले. उपप्राचार्य  प्रा. डी. के. आंधळे सरांनी कर्मयोगाचे महत्त्व समजावत विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश दिला. "चांगले कर्म केल्यास आयुष्याला योग्य गती मिळते. उत्तम कर्माच्या आचरणामुळेच यश प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येकाने कर्माच्या सिद्धांतावर चालावे," असे त्यांनी सांगितले. शिबिरतील सात दिवसात श्रमदानातून वसंत नगर परिसरात जल संवर्धन उपक्रमात अंधार कोळी डोंगर भागात मागण्या वर्षेच बंधार फुटल्या मुळे त्याची  दुरुस्ती केले. 30 लाख लिटर जल साठ वण क्षमता व वन्य पशु प्राण्यासाठी फुटलेल्या धरण दुरुस्ती  करून बंधार पुर्ननिर्मिती १२५ एन. एस. एस च्या विद्यार्थीनी केला. त्या स्वंयसेवकांचा श्रम गौरव जवाहर एज्युकेशन सोसायटी चे सचिव दत्ताप्पा ईटके यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला.  याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीहरी गुटैॢ यांनी केले स्वयंसेवक प्रणव आघाव यांनी आभार मानले. या वेळी  ग्रंथपाल प्रा. डॉ. शंकर धांडे, प्रा. डॉ. सोमनाथ किरवले,  प्रा. डॉ. प्रमोद गीते, प्रा. दिलीप गायकवाड , प्रा. डी. आर. मुंडे उपस्थित होते. एन. एस. एस.  चे स्वयंसेवक  अभिजीत श्रीमंत रोडे, प्रणव आघाव, आकाश फड,  सक्षम सरवदे,  किरण गुट्टे, ओमकेश बांगर, संतोष घनघाव, महेश मुंडे, युवराज गीते, आरती शिंदे, संध्या रोडे, आफरीन पठाण, शितल मुंडे, नेहा आदोडे , नम्रता सरवदे, शुभांगी कांचनवाड, . मनिषा कातकडे , तेजस्वीनी साबळे आधी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!