ग्रामदैवत भामेश्वर मंदिर येथे आयोजन
महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी निमित शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सव ग्रामदैवत
भामेश्वर मंदिर येथे आयोजन
पाटोदा/ अमोल जोशी.
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री व संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त शहराचे ग्रामदैवत भामेश्र्वर मंदिर येथे शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन गुरुवार 20 फेब्रुवारी ते शुक्रवार 28 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील कथाकार संगीताताई पूर्णे ह्या शिव महापुराण कथेचे निरूपण करणार आहेत दररोज सायंकाळी 8 ते 10 या वेळेत ही कथा भामेश्वर मंदिर येथे होईल. तसेच दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती राधाताई महाराज यांचे रात्री 9 ते 11 कीर्तन होईल व दिनांक 27 फेब्रुवारी रात्री 8 ते 10 या वेळेत ह.भ.प. संगीताताई पुर्णे यांचे कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 11 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून श्री. शंभू महादेव व श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेची मिरवणूक सवाद्य , टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार असून भाविकांनी यात सहभागी व्हावे ,मिरवणूक भामेश्र्वर मंदिरात आल्यानंतर विठ्ठल रुख्मिणी संस्थांनचे मठाधिपती सतीश महाराज उरणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसाद भगवान हरिभाऊ मुळे यांच्या वतीने आयोजन करण्यात आला आहे या सर्व भक्तीरसाचा पंच क्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भामेश्र्वर मित्रमंडळ व संताजी युवक मंडळ यांनी केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा