शशीकला गुरुनाथअप्पा लांडगे यांचे दुखःद निधन
परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)
शहरातील मुख्य बाजारपेठेतील रहिवासी शशीकला गुरुनाथअप्पा लांडगे (वय ८६) वृद्धापकाळाने शुक्रवारी (ता.१४) पहाटे ३ च्या सुमारास दुखःद निधन झाले.
शहरातील हैद्राबाद बँक परिसरातील रहिवाशी शशीकला गुरुनाअप्पा लांडगे यांचे शुक्रवारी निधन झाले. शुक्रवारी येथील विरशैव स्मशानभूमीत दुपारी १ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. शशीकला लांडगे धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असत तसेच शनि मंदिरात साजऱ्या होणाऱ्या शनैश्वर जन्मोत्सवात हिरीरीने सहभागी होत असत त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड, पतरुंडे असा परिवार आहे. प्रतिष्ठित व्यापारी वैजनाथ, अश्विन, महेश यांच्या त्या आई होत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा