इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पात्र महिलांना करावं लागणार ई-केवायसी

 लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा ८वा हप्ता महिलांना कधी मिळणार?

मुंबई : महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळवून देण्यात गेमचेंजर ठरली. २१ ते ६५ वर्षांपर्यंतच्या गरजू महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट २०२३ सुरू झाली. मात्र अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता सरकारकडून अपात्र महिलांना यातून बाद करण्याचं काम होती घेण्यात आलं. आतापर्यंत या योजनेमधून ७ हप्ते महिलांच्या खात्यात देण्यात आले. आता फेब्रुवारी महिन्याचा ८वा हप्ता कधी देण्यात येणार अशी महिलांमध्ये उत्सुकता आहे.

फेब्रुवारीचा ८वा हप्ता महिलांना कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण सात हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता महिला लाभार्थी फेब्रुवारीतील आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अर्जाची पडताळणी होणार असल्याने आठव्या महिन्यात पैसे येतील की नाही, अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.ज्या महिलांनी नियमांची पायमल्ली करुन या योजनेचा लाभ घेतला त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. मात्र पात्र महिलांना लाडली बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता २४ फेब्रुवारीपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीत विभागाला पैसे ट्रान्सफर केले आहेत.

अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांबाबत सरकारची कठोर पावलं

विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर सरकारने यासाठी काही नियम, अटी घालून दिल्या. मात्र अनेक महिलांनी योजनेसाठी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता सरकारने अपात्र असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून अपात्र करत आहे. त्यामुळे या फेब्रुवारीच्या महिन्यात अनेक अपात्र महिलांना हप्ते येणार नाहीत. 

पात्र महिलांना करावं लागणार ई-केवायसी

सर्व पात्र आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे नवीन निकष लागू केले जाणार आहेत, ज्यात अपात्र महिलांना योजनेतून बाहेर केलं जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता दरवर्षी जून महिन्यात बँकेत जाऊन ई-केवायसी करून प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. यासाठी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावं लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!