सेवावृत्ती मेजर, रेशीमबंध, निरांजन, विनोद वारी पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
डॉ.सुरेश खुरसाळे, सुनीता देशमुख, विजया मारोतकर वेदप्रकाश वेदालंकार यांच्या हस्ते होणार प्रकाशन
अंबाजोगाई - (वसुदेव शिंदे):-
शहरातील सौभाग्य मंगल कार्यालयात दि ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. अपर्णा कुलकर्णी व अश्विनी निवर्गी लिखित पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे .या प्रकाशन सोहळ्यास तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त वेदप्रकाश वेदालंकार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ.सुरेश खुरसाळे, सुनीता देशमुख नागपुरच्या विजया मारोतकर व ख्यातनाम साहित्यिक वेदप्रकाश वेदालंकार हे उपस्थित राहणार आहेत.
सेवावृत्ती मेजर एस.पी. कुलकर्णी यांनी एनसीसीच्या माध्यमातून केलेले कार्य हे सेवावृत्ती मेजर या पुस्तकातील लेखाद्वारे घेऊन त्यातून जनजागृतीसाठी प्रकाश टाकला आहे.
अपर्णा कुलकर्णी यांनी निरंजन, रेशीमबंध या पुस्तकातून नात्यातील उत्सव चारोळी हे विषय साधण्याचा प्रयत्न केला आहे निरंजन या काव्यसंग्रहातून कवितेद्वारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विनोदवारी या पुस्तकातून समाज प्रबोधन करण्यात आले आहे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . लेखिका अपर्णा कुलकर्णी, अश्विनी निवर्गी यांनी स्वतःच्या लिहिलेल्या पुस्तकांनी आईची तुला करण्यात येणार आहे. पुस्तकाचे वाटप तुलेनंतर करण्यात येईल .अशी एक वेगळी मांडणी या कार्यक्रमात होणार आहे *.
श्रीमती विजया चपळगांवकर यांनी मुख्याध्यापिका म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे ,शिस्त, काटेकोरपणा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन अपर्णा कुलकर्णी, अश्विनी निवर्गी,सीमा पांडे,भूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा