परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत मानव विकास मूकबधिर विद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद

विद्यार्थ्यांचे परिश्रम,जिद्द, आणि शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल कायम- संकेत मोदी

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत संपूर्ण बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळा सहभागी झाल्या होत्या. या क्रीडा स्पर्धेत मूकबधिर प्रवर्गातुन अंबाजोगाई येथील श्री  बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या  मानव विकास मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद  मिळवत आपल्या संस्थेच्या यशाचे सातत्य कायम ठेवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व गुण गौरव  संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांचे परिश्रम , जिद्द व त्याबरोबरच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच संस्थेची यशस्वी परंपरा कायम राहिली असल्याचे मत व्यक्त केले.

          स्पर्धेत सहभागी झालेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निल सूर्यवंशी, सुरज माने,ओम ठाकरे, संस्कार कांबळे, नंदिनी अग्रवाल, अंशिका हातागळे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. लांब उडी, दोनशे मीटर धावणे, गोळा फेक, चारशे मीटर धावणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन दिव्यांगांच्या या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत करण्यात आले होते. वयोगट निहाय  गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम ठाकरे याने तर संस्कार कांबळे याने लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला . त्याचबरोबर पूजा बळी, ओंकार सूर्यवंशी, हर्षदा चाटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.  या संपूर्ण स्पर्धेत मूकबधिर विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाची दोन ,द्वितीय दोन तर तृतीय क्रमांकाची तीन पारितोषिके पटकावत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. 

              मानव विकास मतिमंद विद्यालयातील विद्यार्थी शेख इब्राहिम निजामुद्दीन याने मतिमंद प्रवर्गात लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक  मिळवला तर मानव विकास अपंग विद्यालयातील विद्यार्थी गंगाधर जाधव व राहुल मस्के यांनी अस्थिव्यंग प्रवर्गात १०० मीटर धावणे व २५ मीटर कुबडीवर धावणे  या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक संपादन केला . जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात मानव विकास मूकबधिर विद्यालयाने हिना या चित्रपटातील "देर ना हो जाए" या गीतावर आपले उत्कृष्ट असे समूहनृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवला.जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत मानव विकास मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब चव्हाण यांनी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक संपादन केला.

             श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना  क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रवाहात आणून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असते. विद्यार्थ्यांचे परिश्रम व जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच क्रीडा स्पर्धेतील अजिंक्यपदाचे सातत्य व परंपरा कायम राहिली असल्याची भावना  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करतांना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर  मोदी यांनी व्यक्त केली.  त्याचबरोबर समाजातील उपेक्षीत घटकांना क्रीडा व सांस्कृतिक शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल यासाठी येथील शिक्षक हे विशेष असे परिश्रम घेत असल्याचे संकेत मोदी यांनी सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिश्रम व जिद्द तसेच त्यांना वेळोवेळी मिळणारे  शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संस्थेच्या विद्यार्थ्यांचे यश मिळवण्याचे सातत्य टिकुन आहे.  या  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमुळेच विद्यालयाचे नाव शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर येऊन संस्थेचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल होत असल्याचा अभिमान संकेत मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  संस्था सदैव प्रयत्नशील राहिलअसे संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी आवर्जून नमूद केले. 

             सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आनंद टाकळकर, विशेष शिक्षक व विभाग प्रमुख दिलीप साठे, डी. बी. शिंदे, श्रीमती वर्षाराणी भालकीकर पवार, बी. ए. नांदुरकर, आबेद पठाण, राजेंद्र वाघमारे, विजय कोंबडे, राजेंद्र कसबे यांनी विशेष मार्गदर्शन केले.              

         जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्रा. डॉ. बी.आय. खडकभावी, अध्यक्ष भूषण मोदी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती मेश्राम मॅडम, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुशराव नखाते, संस्थेचे मार्गदर्शक डॉ. डी. एच. थोरात, प्रा.वसंत चव्हाण, दिनकर जोशी, सुरेश मोदी, सी. व्ही.गायकवाड , फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश तरके , बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ, पुजदेकर , मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब चव्हाण, अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक इंद्रकुमार लोढा, मु.अ. विनायक मुंजे, सौ. अंजली जोशी यांनी अभिनंदन  व कौतुक केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!