जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप पीक विम्यापासून वंचीत
सरकारचा दिखाऊपणा उघड ; पीक विमा कंपनीस हप्ता देय केलाच नाही !
■किसान सभेच्या आंदोलनामुळे प्रकरण उजेडात
जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप पीक विम्यापासून वंचीत
परळी / प्रतिनिधी
खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई, सण 2023 मधील प्रलंबित विमा दावे निकाली काढत लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवार दि 17 पासून विमा कंपनी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.खरीप 24 मधील पीक विमा बाबत शासन हिस्सा विमा कंपनीला न दिल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची 4 महिन्या पासून प्रतीक्षा करावी लागत आहे.खरीप सन 2023 या हंगामातील नुकसान भरपाई 10 दिवसात देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यात येतील असे लेखी आश्वासन विमा कंपनी कडून आंदोलनकर्त्याना देण्यात आले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची ठाम भूमिका घेत हे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
खरीप 2024 हंगामातील नुकसान भरपाई निश्चित करून लवकरात लवकर नुकसान भरपाईचे वाटप करण्यात यावे, खरीप 23-24 मधील प्रलंबित मंजूर विमा दावे वर्ग करण्यात यावे, प्रलंबित दावे काही करणास्थाव वर्ग होणे बाकी राहिले तर संबंधित शेतकरी याद्या सबंधित तालुका कृषि कार्यालय यांना देण्यात यावे तसेच तालुका विमा प्रतिनिधि मार्फत शेतकरी यांच्या कडे प्रसारित करण्यात यावेत यासह इतर मागण्या घेत किसान सभेकडून सोमवार दि 17 रोजी पीक विमा कंपनी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.खरीप 24 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिह्यातील शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई बाबत विमा कंपनी कडून अद्याप शासनाकडून शासन हिस्सा रक्कम विमा कंपनीला देण्यात आला नसल्याचे विमा देण्यात अडथळा येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.या आंदोलनाची तीव्रता पाहता विमा कंपनी प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत काही मागण्या येत्या दहा दिवसात योग्य ती कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनामध्ये किसान सभेचे काँ मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके कॉ.भगवान बडे, कॉ.बालाजी कडबाने, कॉ.सुभाष डाके, दादासाहेब शिरसाट कॉ.गंगाधर पोटभरे यांच्यासह जिह्यातील शेकडो शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
●●●●●●
*शेतकऱ्यांच्या लढ्यास आमदार धस यांची भेट*
आपल्या न्याय हक्कासाठी वारंवार चकरा मारून ही प्रश्न निकाली निघत नसल्याने किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी विमा कंपनी समोर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास आ.सुरेश धस यांनी भेट देत आंदोलनकर्ते आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्यात चर्चा करण्यात आली. यावेळी खरीप 24 मधील नुकसान भरपाई देण्याबाबत शासन हिस्सा कंपनीला प्राप्त झाले नसल्याचे समजले असता याबाबत मुंबईला जाऊन कृषिमंत्री आणि वित्त मंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 24 चा विमा मिळण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोयाबिन, तूर, कापूस खरेदी तसेच अन्य प्रश्नावर सभागृहात आवाज उठवू असे आश्वासन दिले.
●●●●●●●
*पदरात पडलं तर ठीक नसता पुन्हा बेमुदत आंदोलन*
पीक विमा कंपनीच्या वतीने सन 2023 मधील खरीप व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप, सन 2024 मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचे वाटप, रब्बी 24-25 मधील पीक विम्याचे वाटप
इत्यादी प्रलंबित विमा प्रश्नावर काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. विमा कंपनी कडून जर या आश्वासनाची पूर्तता नाही झाल्यास किसान सभा जिह्यातील शेकडो बाधित शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयासमोर भरपाई पदरात पडत नाही तो पर्यंत मुक्कामी आंदोलन करण्यात येईल तसेच सोयाबीन कापूस तूर जर हमीभावाने खरेदी नाही झालं तर भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
- एड.अजय बुरांडे
जिल्हाध्यक्ष
किसान सभा, बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा