परळी तालुक्यात गुटख्यावर मोठी कारवाई; १४ लाखाचा गुटखा हस्तगत; धर्मापुरीच्या गोडावूनवर टाकली धाड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांची पाळेमुळे खणून काढून अवैध धंदे बंद करण्याची मोहीम कडकपणाने अंमलात आणली जात आहे. परळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर साठा असणाऱ्या धर्मापुरी येथील गोडाऊनवर धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 14 लाखाचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबतची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
धर्मापुरी येथील एका गोडाऊनवर पोलिसांनी धाड टाकून या गोडाऊन मधील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांनी भरलेली पोतीच्या पोती ताब्यात घेतली आहेत.जवळपास 14 लाखांचा गुटखा या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, एपीआय कवडे, पीएसआय निमोणे, पीएसआय शेख, सुंदर केंद्रे, पांडुरंग वाले, विष्णू घुगे, तुळशीराम परतवाड सुनील अन्नमवार, शंकर वाघमारे, अश्रुबा नागरगोजे, महादू गीते, किशोर गायकवाड, आदिनाथ डापकर, विकास गडदे, पुरी मॅडम, गणेश दहिफळे, सोपान दहिफळे, नितीन होळंबे, मानाजी मुंडे आदींनी ही कामगिरी केली आहे.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची पोलीस प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा