महाशिवरात्रीपुर्वी परळी पोलीसांची मोठी कारवाई: वाहतूक होणाऱ्या अैवध दारुसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
परळी वैजनाथ:प्रतिनिधी.....
परळी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असुन शहरातून वाहतूक होणारी अवैध दारू एका वाहनासह पकडण्यात आली आहे.या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
परळीत सध्या महाशिवरात्र पर्वाची जोरदार तयारी आहे.उद्या दि.२६ रोजी महाशिवरात्र मुख्य पर्वाचा दिवस आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक परळीत दाखल होत असतात.या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अवघ्या एका दिवसावर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या अनुषंगाने पोलीस आणि प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाले असुन परळी शहर पोलिसांनी आझाद चौकात वाहतूक होणारी लाखोंची अवैध दारू पकडली आहे. अंबाजोगाई कडून परळी कडे येत असताना आझाद चौकात परळी शहर पोलीसांनी एमएच २४ इ 65 80 या गाडीमधून मॅकडॉल, ओसी आदी तीन प्रकारच्या अवैध दारूचा साठा पकडला. या मोठ्या कारवाईत वाहनासह एकूण चार लाख 14 हजार 332 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचण व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची पोलीस प्रक्रिया सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा