माजलगाव न्यायालयाचा आदेश

 लघु सिंचन प्रकल्पाचा मावेजा अडवून ठेवला :बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

 माजलगाव न्यायालयाचा आदेश

बीड  : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता . मात्र 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे तीन शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने सर्व प्रकार समजून घेत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्तीचे आदेश दिले.

     माजलगाव कोर्टाने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वाहनाच्या जप्तीच्या आदेश काढल्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कचेरी कार्यालयातून सदर गाडी जप्त करण्यात आली आहे.

         चिखल बीड तालुका वडवणी येथील शेतकऱ्यास तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा न दिल्याने कोर्टाने  जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केली आहे.वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकऱ्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती व या जमिनीचा अत्यंत तुटूपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता. या दाव्यावर कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे अंशता मान्य करून 29-10-2015 रोजी या शेतकऱ्यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल दिला होता. मात्र शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे सह.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा.बुधवंत साहेब यांनी सदर रकमेला व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी पारित केले होते. त्यानुसार कोर्टाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन  जिल्हाधिकारी यांना मावेजा बाबत सोमवार रोजी जाऊन आपली बाजू मांडली व रक्कम अदा करणे बाबत सांगितले मात्र जिल्हाधिकारी यांनी पैशाची पूर्तता करू शकत नाही तुम्ही गाडी घेऊन जा असे सांगितल्याने कोर्टाच्या बेलीपाने माननीय जिल्हाधिकारी यांची गाडी क्रमांक एम एच तेवीस बीसी 2401 ही गाडी कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त करून माजलगाव कोर्टात जमा केली आहे. त्यामुळे एकच खळबळ आली असून याप्रकरणी वादी शिवाजी टोगे संतोष टोगे व बाबू मुंडे यांच्या वतीने ऍड बाबुराव तिडके,एस.एस.मुंडे यांनी  बाजू मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !