अपघातात मृत्यू झालेल्या वारोळा तांडा येथील ऊसतोड मजुरांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत द्या-मंत्री ना.पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ।दिनांक ०३।

शेवगाव येथील साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जात असतांना झालेल्या रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारोळा तांडा (ता. माजलगांव) येथील राठोड दाम्पत्यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करावी अशी मागणी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. 


    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात ना. पंकजाताईंनी म्हटले आहे की,३० जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शेवगाव रस्त्यावर झालेल्या ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये अनिल पिराजी राठोड (वय ३५ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी आरती अनिल राठोड (वय ३३ वर्ष),  रा. वारुळा, आश्रमशाळा तांडा, ता. माजलगाव, जि. बीड या दोन्ही  उसतोड कामगार पती पत्नीचे अपघाती निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात कोणीही कमावते सदस्य नसल्यामुळे त्यांच्या वारसांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. कै. अनिल राठोड यांच्या वारसांना मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !