बीड जिल्ह्यात रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करू नका - अनिल बोर्डे



गेवराई( प्रतिनिधी) सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा सुरू होणार असून या महिन्यात बीड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण विभाग बीड व उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण उप विभाग गेवराई यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. 

     रविवार दिनांक 2 मार्चपासून सर्वत्र मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या कालावधी मध्ये मुस्लिम( रोजा) उपवास ठेवतात. पहाटे सहेरी तर सायंकाळी रोजा इफ्तार करतात रात्री दीड ते दोन तास मजीद मध्ये  तराविहची विशेष नमाज करतात. कुर आन पठण करतात अशा प्रकारे या महिन्यात जास्तीत जास्त इबादत ( उपासना)  करतात त्यामुळे रमजान महिन्यात विजेची अत्यंत आवश्यकता असते या महिन्यात रात्री व दिवसा वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय निर्माण होते.                                        सध्या बीड जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याचा सर्व जनतेला त्रास होत आहे. विशेष म्हणजे रमजान महिन्यामध्ये वीज पुरवठा बीड जिल्ह्यात खंडित होणार नाही याबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्षता घेऊन नियोजन करावे अशी मागणी बीड जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !