काळजी घ्या..सतर्कता पाळा :पोलिसांचे आवाहन
शक्तीकुंज वसाहतीतील चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणेंनी घेतली वसाहतीत बैठक
परळी वैजनाथ
वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या शक्तीकुंज वसाहतीत नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी थर्मल पॉवर स्टेशनच्या सुरक्षा अधिकारी, कर्मचारी व वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांची बैठक घेऊन चोरीला पायबंद घालण्यासाठी घ्यावयाची काळजी व निर्देश दिले.
परळी शहराजवळ असलेल्या शक्तीकुंज वसाहतीत वीज निर्मिती केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. ए, बी, सि असे भाग असलेली अधिकाऱ्यांची निवासस्थान, बँक, दुकान, शाळा असलेली वसाहत गंगाखेड रोडवर अनेक एकरात आहे. मागील काही दिवसांपासून या वसाहतीत चोरीच्या पाच घटना लागोपाठ घडल्याने येथील राहिवाश्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शक्तीकुंज वसाहतीत घडलेल्या या चोरीच्या घटनेचा श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने तपास युद्धपातळीवर चालू आहे.
या चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी थर्मल पॉवर स्टेशनचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी व रहिवाशांची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस निरीक्षक ढोणे यांनी CCTV लावणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा नेमणुकीचा आढावा, व्हाट्सएप ग्रुप बनवणे, बाहेरगावी जाताना घ्यावयाची काळजी व उपयोजना यासंदर्भात सूचना केल्या. कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना त्वरित याची सूचना देण्याचे निर्देश दिले शक्तीकुंज वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षा व मालमत्तेचे रक्षण संभाजीनगर पोलिसांची जबाबदारी असल्याचे सांगत रहिवाश्यांनी सहकार्य केले तर चोरीच्या घटनांना आळा बसेल व झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास त्वरित लावला जाईल असे सांगितले.
शक्तीकुंज वसाहतीत झालेल्या या बैठकीस संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, थर्मल पॉवर स्टेशनचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी व रहिवाशांची उपस्थिती होती.
################
"रहिवाशांनी बाहेरगावी जात असताना आपल्याकडील मौल्यवान दागिने रोकड रक्कम बँकेत ठेवावी. बँकेतून पैसे काढताना आपली जेवढी गरज आहे तेवढीच रक्कम काढावी जास्त रक्कम काढून घरात ठेवू नये. घरातील दिवे बल्ब चालू ठेवावे. अनोळखी संशयित इसम या भागात फिरत असतील तर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. बाहेरगावी जात असताना कोणीतरी एक घरात एक व्यक्ती राहील यासाठी प्रयत्न करा. शक्य असेल तर गल्लीत किंवा घरासमोर, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत."
धनंजय ढोणे,पोलीस निरीक्षक
संभाजीनगर पोलीस स्टेशन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा