भगवानगडाला थेरला गावातून दोन कोटींची देणगी
महिलांकडून कळसासाठी साडेबारा लाख रुपये देणगी; पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी
अमोल जोशी /पाटोदा
भगवानगडावर सध्या गडाचे महंत न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यातच नाही तर जागतिक पातळीवर श्रेष्ठ ठरेल असे संत ज्ञानेश्वर माऊलीचे भव्य मंदिर लोकसहभागातून पुर्णत्वास येत असून यासाठी पाटोदा तालुक्यातील थेरला गावातून २ कोटी १ लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली. तर मंदिराचा कळस लेकीकडून असल्याने महिलांनीही उत्स्फूर्तपणे साडेबारा लाख रुपये देणगी जाहीर केली. आत्तापर्यंत लोकसहभागातून जाहीर करण्यात आलेल्या देणगी मध्ये थेरला येथून सर्वात जास्त देणगीचा वाटा थेरला ग्रामस्थांनी उचला आहे. पाटोदा तालुक्यातील थेरला हे गाव फार पूर्वीपासून भगवानगडाचे भक्तीस्थान आहे. तर बाबांचेही थेरला गावावर विशेष प्रेम होते. त्यांनी त्यावेळी शाळा व वस्तीगृहाचीही सुरुवात केली होती व लेकरांना शिकवा ही शिकवण दिली होती. थेरला येथे जवळपास एक कोटीच्या आसपास खर्च करून अप्रतिम असे मंदिर उभारले असून त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत भगवानबाबा, संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह दिनांक ५ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात ह.भ.प. नंदकिशोर महाराज बोधेगावकर यांच्या भव्य रसाळ वाणीतून संत भगवानबाबा चरित्र कथाही संगीतमय संपन्न झाली.
दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गडाचे महंत न्यायाचार्य नामदेवशास्त्री महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सांगता होणारा हा कार्यक्रम अतिभव्य व नेत्रदीपक झाला. महंत नामदेव शास्त्री थेरला येथे येणार असल्याने पाडळसिंगी टोलनाक्यापासूनच वाहन रॅली काढण्यात आली. तर थेरला फाट्यावरून शास्त्रींना रथात बसून समोर कलशधारी महिला, वारकरी विद्यार्थी, लेझीम पथक, ढोल पथक, हलगी पथक, बँन्ड अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर जीसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री यांनी मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग समोर आसल्याने सावरगाव येथे बाबांच्या जन्मगावीच्या सप्ताहातील ना. गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीतील कीर्तन व नंतर मुंडे साहेबांच्या सांगण्यावरून भगवानगडावर झालेल्या पहिल्या राज्य पातळीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणून केलेल्या सप्ताहाचे वर्णन केले. तर गादीवर बसल्यापासून आजपर्यंतची वाटचाल सांगत गडासाठी थेरला गाव केव्हाही एरव्ही नसले तरी अडचणीत सगळ्यात पुढे असते यांचा आवर्जून उल्लेख केल.तर आताही तुम्ही मागे राहणार नाहीत .असे सांगून देणगीचे आवाहन केले.महंत नामदेव शास्त्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आपआपले देणगीचे आकडे जाहीर केले.तर बाहेरगावी असणाऱ्या अनेकांचा संपर्क झाला नसला तरी उपस्थितातून २ कोटी १ लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली.तर मंदिराच्या कळसासाठी बाबांच्या लेकींकडून म्हणजे महिलांकडून साडेबारा लाख रुपये देणगी जाहीर करण्यात आली यावेळी थेरला आतापर्यंत जमा झालेल्या देणगीत सर्वात जास्त वाटा उचलण्याचा मानही थेरला गावाने पटकावला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा