एन एम एम एस परीक्षेत श्री शंकर विद्यालयाचे घवघवीत सुयश
सात विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण
घाटनांदूर (प्रतिनिधी)
राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घेण्यात येणाऱ्या अर्थात एन एम एम एस परीक्षेत श्री शंकर विद्यालयाने घवघवीत सुयश मिळविले.या विद्यालयाचे सात विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले
मागील महिन्यात घेण्यात आलेल्या एन एम एम एस २०२४-२५ या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.श्री शंकर विद्यालयाचे शुभांगी गणपती मुंडे,आदित्य सचिन सारडा,सिध्दी विष्णू मुंडे,कु.मधू सूर्यकांत गित्ते,साक्षी उमाकांत चाटे,रुपाली राम गान्ने,नंदिनी महादेव मुंडे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले
विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री पंडितराव दौंड ,सचिव श्री.संजय दौंड,व सर्व पदाधिकारी ,मुख्याध्यापक श्री व्ही.एल.गित्ते,सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना येथील शिक्षक डी.डी. नाकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा