वैद्यनाथ कॉलेजमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी
परळी प्रतिनिधी... येथील वैद्यनाथ कॉलेज मध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.क्रांतिसिंह सेवालाल महाराज हे भारतीय समाजसुधारक होते. शूरवीर लढवय्या 'गोरराजवंशी बंजारा' समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत रूपसिंह महाराज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा यासह हा शुरवीर गोरराजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड, उपप्राचार्य डॉ.व्ही बी गायकवाड,प्रा डी के आंधळे,प्रा हरीश मुंडे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ आर डी राठोड, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ व्ही जे चव्हाण, डॉ जे व्ही जगतकर,डॉ माधव रोडे, समन्वयक प्रा उत्तम कांदे, कॅप्टन प्रा गणेश चव्हाण यांच्यासह या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षण तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा