डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान
अमोल जोशी / पाटोदा
येथील नवगण शिक्षण संस्था संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित विभागांच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी कळसंबर ता. जि. बीड स्थित ‘आपला परिवार’ या वृद्धाश्रमास एक दिवसाकरिता अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला होता हा अन्नदान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती मनीषा पवार यांना एक दिवसाच्या अन्नदानासाठी लागणारी रक्कम प्राचार्यांच्या हस्ते ऑनलाईन पाठविण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश माउलगे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. रूपेश कोकाटे, गणित विभागप्रमुख डॉ. पद्माकर ससाने, उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. गणेश पाचकोरे, डॉ. लक्ष्मण गाडेकर, प्रा. गणेश देशमाने, डॉ. अशोक नाईक, डॉ. विनोदचंद्र पवार उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा