थेट अन् ग्रेट : भरतभेट !!

आयोजन :उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या भूमीपुत्राचा १६ फेब्रुवारी रोजी सन्मान व संवाद सोहळा 

थेट अन् ग्रेट : भरतभेट !!


परळी वैजनाथ प्रतिनिधी

     तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा १६ फेब्रुवारी रोजी सन्मान व संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. केवळ सन्मानच नाही तर थेट अन् ग्रेट : भरतभेट  असे आगळेवेगळे या समारंभाचे स्वरूप आहे.या सोहळ्यास तमाम परळीकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

        तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या जर्मन कंपनीचं नाव गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेलं आहे.  दावोस मध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भारताने केलेले गुंतवणूक विषयीच्या सामंजस्य करारांमध्ये झालेला एक मोठ्या गुंतवणूकीचा करार हा या कंपनीने केला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोसमध्ये गेले आणि भरघोस आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. हे महाराष्ट्रासाठी गौरवाचेच आहे.परंतु तेवढ्याच किंवा त्यापेक्षाही मोठा गौरवाचा क्षण वाटला तो म्हणजे महाराष्ट्रातीलच त्यातही परळीचा भूमीपुत्र असलेला उद्योजक भरत गित्ते  यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. खरोखरच त्याक्षणी प्रत्येक परळीकराचा उर अभिमानाने भरून आला. परळीच्या मातीची खरी गुणशक्ती यानिमित्ताने अधोरेखित झाली.विविध क्षेत्रात कितीतरी असेच गुणी परळीकर आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवत आहेत. परळीच्या गुणशक्तीत अधिकाधिक वाढ व्हावी, अनेकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा सन्मान करण्यात येणार आहे.त्याचबरोबर त्यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे.

      लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर परळी वैजनाथ येथे रविवार दि.१६  फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. उद्योग जगतात तळपणार्या या परळीच्या ताऱ्याचा सन्मान होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी आत्मिय संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवण्यासाठी उद्योजक भरत गित्ते यांची परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व लेखक- साहित्यिक  प्रा.राजकुमार यल्लावाड हे  प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्यास परळीकर म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक आपण सर्व परळीकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार