ना. पंकजा मुंडे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून केले कुटुंबाचे सांत्वन

 ऊसतोड मजूर राठोड दांपत्याच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने दिला मदतीचा हात

ना. पंकजा मुंडे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधून केले कुटुंबाचे सांत्वन, प्रितमताई मुंडे यांनी सुपूर्द  मदतीचा धनादेश


बीड | दि. ०६ |  बीड जिल्ह्यातील आश्रमशाळा तांडा येथील मयत ऊसतोड मजूर दांपत्य अनिल राठोड आणि आरती राठोड यांच्या कुटुंबियांची माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी राठोड कुटुंबाचे सांत्वन करून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.


काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ऊसतोड मजूर राठोड दांपत्याचा कर्जत-पाथर्डी मार्गावर रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राठोड यांच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आज त्यांच्या सुचनेनुसार राठोड कुटुंबाची भेट घेऊन त्यांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत आर्थिक मदत सुपूर्द केली.


यावेळी ऊसतोड ना.पंकजाताई मुंडे यांनी राठोड कुटुंबाशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सर्वांची काळजी घ्या, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत' अशा शब्दात त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच प्रितमताई मुंडे यांनी देखील यावेळी संवेदना व्यक्त करून राठोड परिवाराच्या पाठीशी राहण्याचा विश्वास दिला.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार