धसांनी पलटी मारल्याच्या प्रतिक्रिया.......
नवा राजकीय ट्विस्ट: आ.सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्यात भेट!
मुंबई -संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप करणारे भाजपाचे नेते सुरेश धस हेच धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान स्वत: सुरेश धस यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.बीडसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी येऊन धडकली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात ज्यांनी धनंजय मुंडेंवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप केले. त्यांच्याविरोधात रान पेटवलं. आता त्याच धस आणि मुंडे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आ सुरेश धस यांची भेट झाल्याने खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर धस यांनी मुंडे यांना टार्गेट केले होते, त्यानंतर ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.
या दोन नेत्या मध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील शिक्कामोर्तब केले आहे. याच भेटीवर आता खुद्द सुरेश धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशी मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे?
लढ्यामध्ये आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधातच राहणार आहोत. मी धनंजय मुंडे यांना भेटायला गेलो तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी केली. प्रकृतीची चौकशी करणे यात गैर काय आहे? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लढा आणि प्रकृतीची चौकशी करायला जाणे यात काहीही संबंध नाही. हा संबंध कृपया जोडू नये. आमच्यात कोणीही मध्यस्थी केलेली नाही, असेही धस यांनी सांगितले.
मी धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप मागितलेला नाही
आमच्यात साडे चार तास भेट झालेली नाही. आमच्यात भेट झाल्यानंतर बाहेर येऊन मी काय केले, हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या काही दिवसांत मी आणखी काही सांगणार आहे, ते तुम्हाला समजेलच. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजूनही मागितलेले नाही. त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे किंवा न घेणे हे संपूर्णपणे अजित पवार यांच्या हातात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येबाबतचा लढा चालूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय सांगितलं ?
या भेटीवर बावनकुळे म्हणाले,आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो.सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते.दोघांमध्ये मतभेद आहेत,मनभेद नाहीत.दोघेही इमोशनल आहेत.दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो,काळ मतभेद दूर करतो.लवकरच मुंडे आणि धस यांच्यातील मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष असून माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे.त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे.आम्ही तिघेही परिवार म्हणून बसल्याची माहिती बावनकुळेंनी यावेळी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा